क्रिकेट खेळताना बॉल लागल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण
कल्याण – कल्याण पश्चिमेकडील जोशी बाग येथील अब्दुल कादर इमारती मध्ये राहणारे मुनाफ आरकाटे काल चार वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील मक्सी ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत होते .यावेळी त्याच्या बॉल शेजारी खो खो खेळणा-या मुलांकडे गेला .ते बॉल आणण्यासाठी गेले असताना संतापेल्या एका मुलाने मुनाफ यांच्या डोक्यात पेव्हर ब्लोकचा तुकडा मारलातर दुसर्या मुलाने त्यांना धमकी दिली तर त्यांचा मित्र आरबाजला धक्का दिला .या प्रकरणी मुनाफ याने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दोघा जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे .