कौशल्य विकास निरंतर प्रक्रिया असायला हवी-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.१० – कौशल्य विकास ही निरंतर प्रक्रिया असायला हवी आणि नवनवीन संशोधन, लोकांचे जीवनमान सुधारणारे असायला हवे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज तामिळनाडूतील पोल्लची येथे नचीमुथू औद्योगिक संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या हिरक महोत्सवी समारंभांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
तामिळनाडूतील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या उत्थानासाठी मोठे योगदान देणाऱ्या संस्थेचे संस्थापक अरुतचेलवर डॉ. एन. महालिंगम हे आदर्श व्यक्ती असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्याच्या तरुणांनी आणि राजकारण्यांनी अशा गुणांचे अनुकरण करायला हवे.
ग्रामीण आणि शहरी भागातील वाढत्या दरीबाबत चिंता व्यक्त करून शैक्षणिक संस्था, अखंड वीज पुरवठा, पिण्याचे पाणी आणि किफायतशीर वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाभिमुख रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.