कोळसेवाडी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबवले
कल्याण – कल्याण डोंबिवलीत धूम स्टाईल ने पादचारी महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा चक्रावली असतानाच थेट कोळशेवाडी पोलीस स्थानकाच्या गेटसमोरून चालत जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यानी खेचून पळ काढल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .पोलीस स्थानाकासमोर चोरट्यानी धुमाकूळ घातल्याने चोरट्याना पोलीसांची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे .
कल्याण पुर्वेकडील विठ्ठलवाडी खडेगोलवली गोकुळ कॉलनी चाळीत राहणाऱ्या लता कदम 47 या महिला रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्थानकांच्या गेट समोरील भाजी मार्केट येथून चालत जात असताना समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीवर बसलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगसळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी कदम यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: