कोलकाता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रोन केंद्रात सायक्लोन-30 ही मेडिकल सायक्लोट्रोन सुविधा कार्यान्वित

मुंबई, दि.२० – सायक्लोट्रोनचा वापर कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी रेडिओइसोटोप्स तयार करण्यासाठी केला जातो. वैद्यकीय वापरासाठी सायक्लोन-30 या सर्वात मोठ्या सायक्लोट्रोनचे परिचालन या महिन्यात सुरु झाले. गेल्या आठवड्यात 30 एमईव्ही ऊर्जा किरण फॅराडे कपपर्यंत पोहोचले.

त्यानंतर यातून निघालेल्या किरणांचा वापर 18F (फ्लुओरिन-18 आयसोटोप) च्या निर्मितीसाठी करण्यात आला होता. सहाय्यक परमाणू प्रणाली आणि नियामक मंजुरीनंतर इथून पुढल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत नियमित उत्पादन सुरु होईल.

ही सुविधा संपूर्ण देशासाठी विशेषत: पूर्व भारतासाठी किफायतशीर रेडिओइसोटोप्स आणि संबंधित रेडिओ फार्मासिटीकल्स उपलब्ध करेल. गॅलियम-68 आणि पॅलेडिअम-103 आयसोटोपच्या योग्य निर्मितीसाठी जर्मेनिअम-68/गॅलियम-68 जनरेटरसाठी निर्यात क्षमता उपलब्ध करेल. स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि पोस्ट्रेट कर्करोगाच्या उपचारात याची मदत होईल.

सायक्लोन-30 सुविधेमुळे भारतीय वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email