कोलकाता येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेतठाण्याच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी
( श्रीराम कांदु )
ठाणे दि २१: कोलकाता येथे १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र सरस्वती क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टीक्स खेळाडूंनी नेत्र दिपक कामगिरी बजावून ९ सुवर्ण ७ रौप्य व १ कास्य पदकाची लयलुट केली. पदक विजेते खेळाडु व त्यांनी मिळविलेल्या पदकांचा तपशील खालीलप्रमाणे,
14 वर्षा खालील मुले: मानस मानकवळे – 1 सुवर्ण 1 रौप्य, आर्यन दवंडे – 1 सुवर्ण, 1 कांस्य सोहम नाईक – 3 सुवर्ण, 3 रौप्य,गरिमा शर्मा- 1 सुवर्ण,ऋचा देवळे-1 सुवर्ण, 17 वर्षा खालील मुली पुर्वा किरवे -3 रौप्य,19 वर्षाखालील मुले कार्तीक पाडवळकर- सुवर्ण1,यश शिंदे -1 सुवर्ण.
राष्ट्रीय स्तरावर पुर्ण देशभरातील 25 राज्यामधुन एकुण 1200 खेळाडु या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या राष्ट्रीय स्पर्धेतही जिल्हा क्रीडा केद्रातील खेळाडुनी अत्यंत निष्ठेने केलेल्या सरावामुळे स्वत:ला सिध्द केले आहे. वर्षभर दररोज 5 ते 6 तास खडतर मेहनत करणारे खेळाडु व तेवढयाच आत्मियतेने त्यांचा सराव घेणारे प्रशिक्षकामुळेच हे शक्य झाले आहे.
गेल्या 10 ते 12 वर्षापासुन मुख्य प्रशिक्षक महेंद्र बाभुळकर सहप्रशिक्षक, प्रणाली मांडवकर,जयेश कुरकरे यांचे मार्गदर्शनाखाली सरस्वती क्रीडा संकुल येथे 50 जिम्नॅस्टीक्स खेळाडु दररोज 5 ते 6 तास कसून सराव करतात. खेळाडुचे सातत्य व मेहनत तसेच प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे संकुलातील खेळाडुनी राज्य व राष्टीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केलेला आहे.सरस्वती क्रीडा संकुलचे व्यवस्थापक श्री.सहानी व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी खेळांडुचे अभिन्ंदन केले आहे.