कोपर रेल्वे स्थानकावरील पूल रुंद करणार ,शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२९ – डोंबिवली जवळ असलेल्या कोपर रेल्वे स्थानकाची गर्दी वाढत असल्याने एकमेव असलेला पूल अरुंद असल्याने तो रुंद करावा अशी मागणी शिवसेनेने केली त्याला यश आले असून काल पासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. कोपर रेल्वे स्थानकावर रोज सुमारे 40 हजार प्रवासी प्रवास करतात व रोजचे उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे.
शिवाय दिवा वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरून पनवेल पर्यंत मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात कोपर स्थानकावर एकमेव पादचारी पूल असून गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते व चेंगरा चेंगरी पण होते म्हणून शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी केली होती.
शिवाय फलाट क्रमांक एक वरून पश्चिमेला जाण्यासाठी डोंबिवली प्रमाणे होम प्लेटफार्म करावा अशी सूचना त्यांनी केली होती रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधावा म्हणून 1 कोटी रुपये खर्च मंजूर केले या दोन्ही कामाला काल प्रारंभ करण्यात आला असून एक वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. डोंबिवली प्रमाणे पश्चिमेला बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना पुलाचा वापर करण्याची गरज पडणार नाही व एक नंबर फ्लातावरील प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुलाची गरज लागणार नाहींसाध्या कोपर पूल 8 फूट रुंद असून तो 16 फूट म्हणजे दुप्पट रुंद होणार आहे तर अप्पर कोपर स्टेशन जाणारा पूल 12 फूट आहे तो 24 फूट म्हणजे दुप्पट होणार आहे