कोठला परिसरात अवैध कत्तलखान्यावर छापा,८०० किलो गोमांस जप्त
(एम.विजय )
नगर – कोठला परिसरामध्ये काल रात्री पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत जवळपास ७०० ते ८०० किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कोठला परिसरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, तोफखाना पोलिस ठाण्याचे पो. नि. सुरेश सपकाळे, सनस, पाटील त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या पथकातील अभिजीत अरकल, गणेश चव्हाण, सचिन जाधव, युवराज गिरवले, फसले, तुपेकर, ओव्हळ, हारके यांच्या पथकाने कारवाई करत जवळपास ७०० ते ८०० किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.