कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन देण्यास मान्यता
अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 3.33 हेक्टर जमीन कब्जेहक्काने देण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे कोकमठाण परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
कोकमठाण (ता. कोपरगाव) गावाच्या प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये साठवण तलाव आणि जलशुद्धीकरण केंद्र यांचा समावेश आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कोकमठाण येथील गट क्रमांक 341/6 मधील जमिनीची मागणी करण्यात आली आहे. एक विशेष बाब म्हणून बिनशेती दरानुसार चालू वार्षिक दर विवरणपत्रातील दरावर आधारित बाजारमूल्याच्या 10 टक्के रक्कम आकारुन ही शेतजमीन कोकमठाण ग्रामपंचायतीस कब्जेहक्काने देण्यास मान्यता देण्यात आली.
Please follow and like us: