कोकण रेल्वेच्या तेजस एक्स्पेसमधील ४० प्रवाशांना विषबाधा,चिपळूनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल

( श्रीराम कांदु )

कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्स्पेसमधील ४० प्रवाशांना खाण्यातून विषबाधा झाल्याने एक्स्प्रेस चिपळून स्थानकात थांबवण्यात आली. बाधितांना तातडीने चिपळूनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाधितांपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एक्स्प्रेस मडगावहून मुंबईकडे निघाली होती.

 तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस आहे. तेजस एक्स्प्रेस दर रविवारी करमळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूनच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. ज्यांना त्रास जाणवू लागला अशांची संख्याही मोठी होती. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळून स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला ५ ते ६ प्रवाशांना तातडीने चिपळून शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

ज्यांना प्रवाशांना त्रास जाणवू लागला आहे, अशांची संख्या ४० पेक्षा अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. ही विषबाधा नेमक्या कोणत्या अन्नातून झाली याचा तपास सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email