कोकण पदवीधर निवडणूक: मतदानाची वेळ वाढविली,मतदारांसाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर

ठाणे दि १५: भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे  कोकण विभाग पदवीधर  विधानपरिषद मतदार संघाची निवडणूकीकरिता  मतदानाची  वेळ 2 तासांनीवाढविली आहे.

सोमवार 25 जून, 2018 रोजी मतदानाची वेळ आता वाढीव  वेळेनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल

 कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचे मतदान केंद्रांची व मतदारांची यादी  www.thaneelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अधिकमाहितीसाठी 25344143 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा.

ठाण्यात 45 हजार 834 मतदार

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ठाणे जिल्हयातील ठाणे तालुक्यामध्ये एकूण 30 मतदान केंद्र असून एकूण 26 हजार  567 इतके  मतदार,  कल्याणतालुक्यामध्ये एकूण 9 मतदान केंद्र असून एकूण 6676 इतके  मतदार,  भिवंडी तालुक्यामध्ये  एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 3306 इतके मतदार,  शहापूरतालुक्यामध्ये एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 2340 इतके मतदार, मुरबाड तालुक्यामध्ये एकूण 2 मतदान केंद्र असून एकूण 1469 इतके मतदार, उल्हासनगरतालुक्यामध्ये एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 1979 इतके मतदार, अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण 4 मतदान केंद्र असून एकूण 3497 इतके मतदार असे एकूण 54मतदान केंद्र असून  45834 इतके मतदार आहेत.

ज्या पदवीधर मतदारांनी त्यांचे नाव कोकण पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविलेले आहे त्या पदवीधर मतदारांनी दिनांक 25 जून  सोमवार रोजी सकाळी 7ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले नजिकच्या मतदान केंद्रात जावून मतदान करावे असे याव्दारे जिल्हा निवडणूक अधिकारीठाणे जिल्हा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email