कै. विवेक नेरलेकर यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनोखी सांगितीक श्रध्दांजली …….

डोंबिवलीच्या सांगितीक विश्वातले एक महत्वाचे नाव कै. विवेक नेरलेकर …… त्यांंची हार्मोनियम, सिंथेसायझर आणि गिटार वरील नजाकत आणि सांगितीक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची अखंड धडपड डोंबिवलीतील संगीतप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत. संगीताची असलेली जाण आणि नवनवीन शिकण्याची धडपड यामुळे विवेकची ओ.पी. नय्यर आणि विलास डफळापूरकर याच्याबरोबर असलेली ऊठबस डोंबिवलीतल्या जून्या संगीतप्रेमींनी पाहिली आहे.
कै.विवेकने या जगातून अचानक घेतलेली Exit डोंबिवलीच्या संगीत विश्वाला, त्याच्या मित्र परीवाराला आणि त्याच्या कुटुंबीयांना चटका लावून गेली. पहाता पहाता एक वर्ष होत आले. श्रीनिवास खळेंच्या सांगितीक कारकिर्दीवर एक कार्यक्रम बसवण्याच्या प्रयत्नात असतानाच विवेकचे अचानक दुर्दैवी निधन झाले आणि म्हणूनच कै. विवेकच्या प्रथम स्मृतिदीनाचे औचित्य साधून विवेकचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार श्रीनिवास खळे एक विवेकी सूर या कार्यक्रमातून दि. १२ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वा. सर्वेश हाँल येथे त्याला सांगितीक श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी संगिता आणि मुलगा अखिलेश यांनी केले आहे तर अनुजा वर्तक, विजय वेदपाठक,धवल भागवत, आनंद पेंढारकर,नेहा नामजोशी,उर्मिला वैद्य, उदय कुरतडकर व इतर सहकलाकार सांगितीक श्रध्दांजली अर्पण करणार आहेत.सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीतील तमाम संगीतप्रेमींनी आणि विवेक नेरलेकर यांच्या  मित्रपरीवाराने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे  आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email