केडीएमसी चा बीएसयुपी प्रकल्प होणार कधी ? किती वर्षे लागणार ? आणि तोपर्यंत शौचालय दुरुस्ती किंवा बांधकाम करणारच नाही का ?

( म विजय )

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळील इंदिरानगरची वस्ती जवळपास दीड ते दोन हजारापर्यंत आहे ! त्यातील काही क्षेत्रात बीएसयुपी योजना राबवली गेली ! पण अजूनही 1000 – 1100 लोक या योजनेपासून वंचित आहेत ! यांना वर्षानुवर्षे या योजनेचे आमिष दाखवून टांगणीवर ठेवले आहे ! ( यांचा या योजनेत समावेश आहे ! पण प्रत्यक्षात कधी होणार ? हा प्रश्नच आहे ! )
तर ! आजची परिस्थिती अशी आहे की जवळपास एक हजार लोकवस्तीसाठी अवघे 10 शौचालये आहेत ? त्यातील 4 खाजगी संस्थेमार्फत शुल्क आकारून चालवली जात आहेत ! तर इतर 6 पैकी 2 शौचालयांची दुरवस्था फारच भयानक आहे ! दरवाजेसुद्धा नाहीत ?
स्वच्छ भारत मिशन सुरू आहे ! त्याचे अनुदान महापालिका घेऊन मोकळे झाले आहे ! आणि इथे एवढी भयानक अवस्था ?
कृपया , एकतर शौचालयांची संख्या तात्काळ वाढवावी ! किंवा वैयक्तिक शौचालयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देऊन त्याप्रमाणे व्यवस्था करावी !
या एवढ्या मोठ्या लोकवस्तीला त्रास तर होत आहे पण आजूबाजूच्या सर्वच मोठ्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे ! प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याचं गांभीर्य आहे की नाही ?
की कोण दुकानांचे , शोरूमचे , बैठ्या घरांचे वाढीव किंवा दुरुस्तीचे बांधकाम करत आहे ? याची “हुंगी तपासणी” करायचेच काम सुरू आहे ? या हुंगी तपासणीच्या कार्यपद्धतीमुळे झालेल्या एका IIT शिक्षित वॉर्ड ऑफिसरच्या मृत्यू ची हळहळ अजून विसरले नाहीत !
मा. आयुक्तांनी या क्षेत्राचा पाहणी दौरा करून तात्काळ निर्णय घ्यावा !

विशेष नोंद — याच परिसरातील एका तरुणाच्या अचानक गायब होण्याच्या घटनेचा संबंध काही माध्यमांद्वारे थेट  आईएसआईएस ने ही इथे बैचेनी आहे ! मा. पोलीस अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यायला हवी ! एक प्रकारचं वैफल्य या क्षेत्रात असल्यानेही असे प्रकार घडू शकतात ! ( घरातून पळून जाण्याचे )
रोजंदारी चे जिवनसंघर्ष असलेल्या व स्थानीय स्वराज्य संस्थांनीही अशी भयानक परिस्थिती निर्माण केल्यानेही वैफल्य येऊ शकते ! त्यात फेरीवाले मोठ्या संख्येने इथे रहात असल्याने सध्या अशीही आर्थिक संकट आहेत ! ( याबाबतही पालिकेचे काही धोरण नाही !)
अशावेळी त्या तरुणाच्या वर्षभर गायब होण्याला आईएसआईएस शी जोडले जाणे हे चुकीचे आहे ! जर कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांकडे अशी प्रतिक्रिया दिली असेल किंवा माध्यमांपैकी काहींनी अधिक उताविळपणा दाखवला असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यांना समज द्यावी ही विनंती !

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email