केडीएमटी बस चालकाला मारहाण

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बस च्या चालकाला एका प्रवाशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात महेश साळुंखे या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे .काल सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास शाम पिसके ४५ हे केडीएमटी चे बस चालक कल्याण भिवंदी  बस घेवून जात होते .बस शिवाजी चौक परिसरात आली असताना अचानक महेश साळुंखे हा प्रवासी धावत्या बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता यावेळी चालक पिसके यांनी त्याला मागील दरवाजाने ये असे सांगितले असता संतापलेल्या साळुंखे याने पिसके यांच्या सह प्रवाशांना शिवीगाळ करण्यात सुरुवात करत पिसके यांना धक्काबुक्की केली या प्रकरणी पिसके यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली  असून या तक्रारी नुसार पोलिसांनी महेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email