केडीएमटी चालकाला मारहाण
डोंबिवली –आपल्या ताब्यातील केडीएमटीची बस डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोड वरून चालक यशवंत वाघमारे ४९ हे डोंबिवली स्थानकाजवळील बस स्टॉप वर आणत असताना दुचाकी चालक विशाल गुप्ता उर्फ मॉन्टी याने आपली दुचाकी केडीएमटी बस समोर आडवी उभी करून वाघमारे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच बसची चावी काढून फेकून दिली हि चावी शोधणा-या वाघमारे यांना पुन्हा मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याना जखमी केले तसेच यावेळी वाघमारे याना सोडविण्यासाठी आलेल्या सहकारी वाहकांना देखील गुप्ता याने धक्काबुक्की केल्याची तक्रार वाघमारे यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
Please follow and like us: