केंद्र शासनाच्या पथकाकडून स्वच्छतेचे सर्वेक्षण जिल्ह्यातील निवडक आठ ग्रामपंचायतीची होणार तपासणी

ठाणे दि.१८ – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण सुरु असून जिल्ह्यातील निवडक आठ ग्रामपंचायती मध्ये केंद्रशासनाने नियुक्त केलेल्या स्वच्छता पथका मार्फत ही तपासणी सुरु असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा ) छायादेवी शिसोदे यांनी दिली.

हेही वाचा :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली

ग्रामपंचायती मध्ये ही तपासणी १८ ते २२ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून शहापूर तालुक्यातील सानेपाली, शिरोळ, वेळूक, सरलांबे, चोंढे तर मुरबाड येथील कान्होळ तसेच अंबरनाथ येथील अस्नोली आणि भिवंडी मधील कुरुंद अशा एकूण आठ ग्रामपंचायतीची तपासणी कमिटी मार्फत करण्यात येणार आहे.

हेही वाचा :- महान क्रिकेटपटू हरपला – मुख्यमंत्री

हे सर्वेक्षण स्वच्छते संदर्भातील घटकाबाबत करण्यात येणार असुन त्यासाठी गुणांकन पदधती निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणा-या जिल्हयांना राष्ट्रीय स्तरावरुन ०२ ऑक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email