केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीतील आयटीओ आणि मुकर्बा चौकात वायू प्रदूषण नियंत्रण उपकरणाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.२५ – केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज दिल्लीतल्या आयटीओ आणि मुकर्बा चौकात “वायू” या प्रदूषण नियंत्रण उपकरणाचे उद्‌घाटन झाले. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्था तसेच निरी यांनी संयुक्तरित्या हे उपकरण विकसित केले आहे.

या उपकरणामुळे 500 मीटर चौरस क्षेत्रफळातील हवा शुद्ध होईल असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. अशाच प्रकारची आणखी उपकरणे दिल्ली शहरात लावून 10,000 मीटर क्षेत्रफळातील हवा शुद्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

हे उपकरण वीजेवर चालणारे असून त्याच्या देखभालीसाठी महिना दीड हजार रुपये खर्च येतो. कार्बन तसेच युव्ही दिव्यांमधून निघणाऱ्या विषारी वायुसह दूषित हवा स्वच्छ करण्याचे काम हे उपकरण करते.

Leave a Reply

Your email address will not be published.