केंद्रीय माहिती आयोगाच्या तेराव्या परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१३ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आयोगाच्या तेराव्या परिषदेचे उद्घाटन केले. माहितीचा मुक्त ओघ हा लोकशाहीचा आत्मा आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. जनतेला शासन कसे चालते, सरकारी निधी कसा खर्च होतो, सार्वजनिक सेवा कशा पार पडतात आणि कल्याणकारी योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी होते हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. भारतीय लोकशाही मजबूत करण्याचा माहिती अधिकार कायदा हा एक भाग आहे याद्वारे शासन प्रणालीत पारदर्शकता येते तसेच सामान्य नागरिकाला निर्णयांची माहिती मिळते असे राष्ट्रपती म्हणाले.
नागरिकांना सेवा पुरवणे तसेच सरकारी निधीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी माहिती अधिकार कायदा ही महत्त्वपूर्ण संकल्पना असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. खाण क्षेत्राच्या ई-लिलावासाठी इंटरनेट आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा वापर केला जात आहे. वस्तू आणि सेवांच्या सरकारी खरेदी करण्यासाठी ही बाजारपेठ किंवा जीईएम पोर्टल सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व उपाययोजनांमुळे कार्यक्षमता वाढवून गळतीला आळा बसतो असे ते म्हणाले. माहितीचा अधिकार आणि खासगीपणा जपण्याचा अधिकार या दोन्हीमध्ये उत्तम संतुलन असायला हवे यावर त्यांनी भर दिला.