केंद्रीय माहिती आयोगाच्या 13व्या वार्षिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या उद्घाटन
नवी दिल्ली, दि.११ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या केंद्रीय माहिती आयोगाच्या 13व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. माहितीचा खासगीपणा आणि माहितीचा अधिकार, माहिती अधिकार कायद्यात दुरुस्ती आणि माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी या विषयावरील या परिषदेत प्रशासन सुधारण्यासाठी पारदर्शकता आणि दायित्व याबाबत उपाययोजना सुचवण्यात येणार आहे.
मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथूर स्वागतपर भाषण करतील.
केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगांचे सर्व आजी आणि माजी मुख्य माहिती आयुक्त, माहिती आयुक्त तसेच सरकारी अधिकारी यात सहभागी होतील. आरटीआय कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणी संबंधित स्वयंसेवी संस्था या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
Please follow and like us: