केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांच्या हस्ते सुरत येथे गुजरातमधल्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन झाले. सुरत जिल्ह्यातल्या मंगरोल तालुक्यातल्या शाह आणि वसारवी गावांमध्ये हा पार्क आहे. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यात केंद्रीय अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाद्वारे दुसऱ्या मेगा फूड पार्कला मंजुरी देण्यात आली आहे.
आज उद्घाटन झालेल्या फूड पार्कमुळे सुरत तसेच नवसारी, तापी, नर्मदा आणि भरूज जिल्ह्यातल्या जनतेला लाभ होणार आहे. 117 कोटी 87 लाख रुपये खर्चाचा हा फूड पार्क सुमारे 70 एकर जमिनीवर उभारण्यात आला आहे. या फूड पार्कमध्ये कोल्ड स्टोअर, गोदामं तसेच अन्न प्रक्रियेशी संबंधित इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या पार्कमुळे सुमारे 5,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार असून या भागातील सुमारे 25,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
“मेक इन इंडिया” अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाला सरकार मोठी चालना देत आहे असे बादल यांनी यावेळी बोलताना सांगितले.