केंद्रीय अतिरिक्त सचिव डॉ.बाला प्रसाद यांची ठाणे जिल्हा परिषदेला सदिच्छा भेट

जिल्हा परिषदेने राबवलेल्या योजनांचा घेतला आढावा

ठाणे-  महाराष्ट्र शासन पंचायतराज विभागाअंतर्गत  ठाणे जिल्हा परिषदेने कार्यक्षेत्रात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी  शुक्रवार दिनांक १५ जून रोजी केंद्रीय अतिरिक्त सचिव (पंचायत राज) भारत सरकार यांनी जिल्हा परिषद मुख्या01लय ठाणे येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष मंजुषा जाधव तसेच महिला व बाल कल्याण सभापती दर्शना ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

या बैठकी दरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांबाबत सविस्तर माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. पाणी पुरवठ्यामध्ये जिल्हा परिषदेला ५०० पेक्षा जास्त योजना कार्यान्वित करण्याबाबत यश आलेले असल्यामुळे केंद्रीय सचिवांनी  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले.

त्याच बरोबर प्रधानमंत्री आवास योजने बाबतची प्रगती , संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (आपले सरकार) योजने मध्ये ठाणे जिल्ह्याची प्रगती दिवसागणिक उंचावत असून प्रधानमंत्री आवास योजने बाबत ठाणे जिल्ह्याचे काम उल्लेखनीय असल्याचे देखिल विवेक भीमनवार यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव , महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, उप अभियंता ( पाटबंधारे ) पी. आर. तडके , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एच. डी. दोडके , जिल्हा कृषी अधिकारी अर्चना आखाडे आदि अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email