कृषी क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.20 – शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनविण्याबाबतच्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्या पुणे येथे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याबाबत विविध स्तरावर सुरु असलेल्या चर्चा आणि प्रयत्नांच्या संदर्भात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवरही या चर्चासत्राला केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार, ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक प्रा. एम.एस.स्वामीनाथन, प्रसिद्ध कृषी आणि अर्थ तज्ज्ञ प्रा. अशोक गुलाटी आणि केंद्र सरकारच्या विविध संघटनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email