कुलूप तोडून घरफोडी
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील संतोष नगर येथील शिवमंगल अपार्टमेंट येथे राहणारे सुखदेव कुंभारे काल सुमारास घराला कुलूप लावून घराबाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने,मेडल,रोकड असा मिळून एकूण 50 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .रात्री उशिराने घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अद्न्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: