कुत्र्याला मारहाण करणा-यांना विरोध केल्याने शिवीगाळ करत केली मारहाण
कल्याण – कुत्र्याला लोखंडी रॉड ने मारहाण करत असणा-या तरुणाला विरोध करताच संतापलेल्या तरुणाने शिवीगाळ केली तसेच त्यानंतर एका रिक्षा चालकाने रिक्षात बसवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने चक्क रस्त्यावर पडलेला दगड रिक्षा चालकच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अंक्या व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौक तीसगाव रोड वैभव नगरी येथे राहणारे मंगल यादव काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिसगाव रोड ने जात असताना अंक्या नावाचा तरुण आपल्या एका मित्रासह एका कुत्र्याला लोखंडी रॉड ने मारहाण करत असल्याचे आढळून आले त्यांनी या तरुणांना विरोध केला असता अंक्या आणि त्याच्या मित्राने यादव यांना शिवीगाळ केली तसेच काही वेळाने संजीनवी माने हे रिक्षा घेवून जात असताना त्यांनी अंक्या आणि त्याच्या मित्राला रिक्षात बसवण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या अंक्या आणि त्याच्या मित्राने रस्त्यावर पडलेला दगड माने यांच्या डोक्यात घातला .या हल्ल्यात माने गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार अंक्या आणि त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करत करण्यात आला आहे.