कुत्रा भुंकल्याने कुत्र्याच्या मालकिणीसह कुत्र्याला ही मारहाण

कल्याण – कुत्रा भुंकल्याने संतापलेल्या  एका इसमाने कुत्र्याच्या मालकीणीसह कुत्र्याला हॉकीस्टिक ने मारहाण केल्याची  घटना डोंबिवलीत घडली .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
डोंबिवली पुर्वेकडील लोढा पलावा येथे राहणाऱ्या नितु उच्चील 31 या महिला काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या कुत्र्याला घराच्या परिसरात फिरवत होत्या .या दरम्यान एक अनोळखी इसम त्यांच्या समोरून कुत्रा घेऊन चालला होता .अचानक उच्चील यांचा कुत्रा त्या कुत्र्यावर भुंकला .त्यामुळे उच्चील अनोळखी इसमाची माफी मागण्यास गेल्या असताना या अनोळखी इसमाने उच्चील याना शिवीगाळ करत त्यांना  हॉकीस्टिक ने मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याच्या कुत्र्याला ही मारहाण  केली.उच्चील यांनी या प्ररकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email