* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> कुख्यात भोपर येथील गुंड संदीप माळी याला लैगिंक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

कुख्यात भोपर येथील गुंड संदीप माळी याला लैगिंक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

डोंबिवली दि.१९ – डोंबिवली जवळील भोपर येथील नामचीन गुंड संदीप गोपीनाथ माळी याने रिव्हॉवरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत वारंवार जबरी संभोग केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आज त्याला ‘ बाल लैगिंक अत्याचार कायद्याखाली ताब्यात घेतले आहे. संदीप माळी याचा भाऊ महापापालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य आहेत. तर वहिनी प्रभाग 114 (भोपर सदप) भाजप नगरसेविका आहे. त्याचे विरुद्ध खडणी ,मारामारी ,खून असे अनेक गुन्ह्याची नोंद आहे.  

पीडित मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार जुलै 2015 ते 16 ऑगस्ट 19 या काळापर्यंत दमदाटी ,धाक दाखवून जबरी संभोग करत असल्याची तक्रार करण्यात आली. कुशाला लॉज व इतर अनेक ठिकाणी जबरी संभोग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. आज सकाळी 11 -30 वा मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर अजून माहिती आली नसल्याचे सांगत होते. संदीप माळी याचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत पोलीस अजून अटक केल्याची कबुली देत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *