किरकोळ कारणावरून डोंबिवलीत एका तरुणाची हत्या
डोंबिवली दि.३० – किरकोळ कारणावरून डोंबिवलीत एका तरुणाची हत्या करण्यात आली. कुंदन जोशी (३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पश्चिमेच्या जुनी डोंबिवली (सखाराम नगर) भागात रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जॉब ऑफर करण्याच्या कारणावरून तरूणांच्या दोन गटात वाद झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एका गटातील तरूणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात कुंदन जोशी याचा मृत्यू झाला.
तर भावाला वाचवायला मधे पडलेला कुंदनचा मोठा भाऊ मुकेश जोशी हा देखिल गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला तात्काळ एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Please follow and like us: