किरकोळ अपघातामुळे एका तरूणाला चौकडीने केली बेदम मारहाण

डोंबिवली :- दि.२० (प्रतिनिधी ) डोंबिवली मोठागाव रेतीबंदर रोड शांताराम छाया येथे राहणारे बाबाजी शांताराम म्हात्रे( ४३) रविवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोठागाव येथे रेल्वे फाटकने आपल्या चार चाकी गाडीने जात होते .यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने ते गाडी हळू चालवत असताना  त्यांना गाडीला कुणी तरी ठोकर दिली. त्यामुळे त्यांनी पुढे जावून गाडी थांबवली असता त्यांच्या मागून येणारी एक कार त्यांच्या पुढे येवून थांबली.त्याने तू गाडी का थांबवली याचा जाब विचारत  कार मधून उतरला. सचिन म्हात्रे हा बाबाजी यांच्या ओळखीचा असल्याने बाबाजी यांनी ‘ तू दारू पिला आहेस ,  इथून जा’ असे सांगितले त्यामुळे संतापलेल्या सचिन ने बाबाजी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करत थोशाबुक्क्यानी मारहाण केली. याच दरम्यान त्याचे दोन साथीदार रत्या म्हात्रे व इतर दोघांनी शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेले पेव्हरब्लॉक तसेच स्टील च्या बादलीने मारहाण केली .या मारहाणीत  बाबाजी गभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले असून या प्रकरणी त्यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सचिन म्हात्रे ,रत्या म्हात्रे व त्याच्या दोन साथीदार विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email