कार सापडली मात्र चालक बेपत्ता,पोलीस तपासाबाबत माहिती देत नसल्याचा पत्नीचा आरोप …

(श्रीराम कांदु)
कॅब गाडी चालवून उदरनिर्वाह करणारा डोंबिवलीतील एका तरुण बेपत्ता झाला असून मुंबई येथील सायन परिसरात व्होला थांबा येथे सदर कार पोलिसांना सापडली आहे. मात्र चालकाचा अद्याप पत्ता लागला नाही. बेपत्ता तरुणाच्या पत्नीने डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.मात्र पोलीस त्याच्या पत्नीला तपासाबाबत माहिती देत नसल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

    डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली परिसरात रहाणारे आदित्य पवार हे ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी साडे आठ वाजता  कॅब गाडी घेऊन कामावर गेले होते.दुपारी १ वाजता आदित्य यांनी पत्नी दीपा यांना फोन करून मी गाडीमध्ये आहे , माझ्या बरोबर कस्टमर आहेत , मी आता पनवेल वरून ठाणे येथे जाणार आहे असे  सांगितले. त्यानंतर पत्नी दीपा यांनी सांयकाळी पती आदित्य यांना फोन केला असता त्यांचा संपर्क झाला नाही असे ११ तारखेला त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत म्हटले आहे. माझे पती यांनी लग्नापूर्वी घेतलेल्या कर्जामुळे त्यांना मानसिक त्रास होत असल्याची म्हटले आहे . माझ्या पतीच्या तपासाबाबत पत्नी दीपा ह्या पोलीस ठाण्यात विचारण्यास गेल्या असता त्यांना पोलीस तपासाबाबत माहिती देत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र ज्या ठिकाणी गाडी सापडली आहे तेथील आणि आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे  पोलिसांचे म्हणणे आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email