कारसह मद्यसाठा जप्त

नाशिक – विनापरवानगी मद्याची वाहतूक करणा-या कारसह मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला़ आहे. याप्रकरणी शेख नफिस शेख इकबाल व महेश माधव कांबळे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंबोली-वेळुंजे रस्त्यावर एक पांढ-या रंगाची इंडिका कार अडवून तिची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा नगरहवेली येथे निर्मित व त्याच ठिकाणी विक्रीचा परवाना असलेल्या विदेशी दारूचा साठा आढळून आला़ २३ हजार ४७२ रुपये किमतीच्या या मद्यास महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध आहे़.सदर मद्यसाठा व कार असा १ लाख ७३ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी शेख नफिस शेख इकबाल व महेश माधव कांबळे यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोलीस हवालदार राजू दिवटे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस शिपाई लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले यांनी सदर कारवाई केली़.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email