कल्यान-डोंबिवलीत दोन घरफोड्या

( श्रीराम कंदु )
कल्याण-डोंबिवली वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे दहशती खाली आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलीस यंत्रणा मात्र सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यातच शनिवारी दिवसभरात दोन घरफोडीच्या घटनांची नोंद कल्याण-डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यांत झाली आहे.
कल्याण पश्चिमेकडील बेतूरकरपाड्यातल्या भोइर कॉलनी कदम चाळीत राहणारे लक्ष्मण बानखोले शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराला कुलुप लावून कामानिमित्त वाहेर गेले होते. हीच संधी साधत चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा मिळून एकूण 11 हजार 800 रुप्यांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दुसरी घटना डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव येथील स्वामी समर्थ चाळीत राहणारे संगीता किशन मातो बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सूमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चांदीचे दागिने, रोकड व घड्याळ असा मिळून एकूण 30 हजरांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री उशिराने घरी परतल्या नंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email