कल्याण येथे टँकरच्या चाकाखाली येऊन पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 

डोंबिवली – कल्याण शिवाजी चौक परिसरात शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीने पती पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह दुचाकीने घरी परतत असताना  रस्ता उंच सखल असल्याने त्यांचा अचानक तोल गेल्याने दुचाकी घसरली व बाजूने जात असलेल्या टँकरच्या चाकाखाली पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली .तर हा अपघात घडल्या नंतर अवघ्या तासाभरात अजून एक महिलेची दुचाकी घसरली सुदैवाने या महिलेला दुखापत झाली नाही . बळी गेल्यावर देखील प्रशासनाला जाग येणार आहे की नाही असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. 
         वीज वितरण कंपनीत कामाला असलेले महेश आठराळे हे गौरीपाडा येथे राहत असून ते आपल्या दुचाकी वाहनाने आपली पत्नी व पाच वर्षाच मुलगा आरव सह टिळक चौक येथे राहणर्या बहिणीच्या घरी गेले होते . बहिणीच्या भेटी पश्चात ते पुन्हा आपल्या घरी परतण्यासाठी शिवाजी चौक येथून आग्रा रोड चौक दिशेने जात होते.शिवाजी चौक सिमेंटचा असून काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स टाकले असल्याने रस्ता उंच सखल असल्याने त्याचा  तोल गेला व ते खाली पडले याच दरम्यान अचानक पणे पाठीमागून येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ०४ सी यु २१८२  टँकरच्या चाकाखाली आरव सापडून त्याच्या अंगावर टँकरचे मागचे चाक गेल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या घटनेतून मुलाचे आई बाबा बचावले आहेत. विशेष म्हणजे महेश यांची पत्नी सात महिन्याची असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली असून आपल्या पोटच्या मुलाचा डोळ्या समोर मृत्यू झाल्याचे कळताच आई वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे .  चौकट  शिवाजी चौकातील रिक्षा स्टॅण्ड मुळे होते वाहतूक कोंडी  पालिका मुख्यालयानाजीक असलेल्या दिवाडकर मार्गावर  रस्त्यावर असलेले रिक्षा स्टॅण्ड वाहतूक कोंडीला आमंत्रण ठरत आहे शिवाजी चौकात चार ही बाजूनी वाहतूक होत असताना या रिक्षा स्टँड मुले मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते नेहमीच चिंतामण ज्वेलर्स पासून ते वामन हरी पेठे ज्वेलर्स पर्यंत भर रस्त्यात  बेशिस्त पणे लावण्यात आलेल्या रिक्षा अनेकदा कारणीभूत ठरतात .त्यामुळे या रिक्षा स्टॅण्ड वर कारवाईची मागणी केली जात आहे मात्र वाहतूक पोलीस आणि आरटीओ कारवाई करत नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत असून या रिक्षा स्टॅण्ड वर कारवाइची मागणी केली जात आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email