कल्याण पूर्वेला लवकरच मिळणार विस्तीर्ण मैदान,खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

(श्रीराम कांदु )

ठाणे  महानगरांमध्ये मोकळ्या जागेची वानवा असताना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे कल्याणकरांना तब्बल १२ एकर मैदानाचा लाभ मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केलेल्या या जागेच्या विकासासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी दिली आहे. या जागेपैकी अडिच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागा तातडीने ताब्यात घेण्याचे निर्देश खा. डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी दिले.

कल्याण पूर्वेमधील तिसगांव १०० फुटी रोड जवळील ही १२ एकर जागा महापालिकेने मैदानासाठी आरक्षित केली आहे. या जागेची पाहाणी शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी महापौर रमेश देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव यांच्यासह केली. याप्रसंगी नगरसेवक मल्लेश शेट्टी,. नवीन गवळी, महेश गायकवाड, नगरसेविका राजवंती मढवी, शीतल मंढारी, सुशिला माळी, उर्मिला गोसावी, विमल भोईर, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, श्री. दाखिनकर आदी उपस्थित होते.

सदरहू जागा संपादित करण्याची कारवाई महापालिकेने त्वरित सुरू करून जागेच्या विकासाचे कामही सुरू करावे. खासदार निधीतून काही निधी आणि महापालिकेचा निधी यांचा वापर करून विस्तीर्ण मैदान कल्याणकरांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email