कल्याण पूर्वेत दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू

(श्रीराम कांदु)
कल्याण : काल रात्रीच्या सूमारास कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज जवळ अर्पणा डेयरी जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला .दीपेश भामरे 25 ,सुमित नायर25 ,अरविंद हिरे 45 असे या तीन मयत तरुणांचे नावे आहेत .
             कल्याण पुर्वेकडील पूना लिंक रोड श्रीराम टॉकीज अर्पणा डेयरी  जवळ काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रन सुटल्याने हनुमान मंदिरा नजीक असलेल्या दुकानाच्या शिड्यावर दुचाकी धडकली व दुचाकींचा  अपघात झाला .या अपघातात दुचाकिवर बसलेल्या  दीपेश भामरे 25 ,सुमित नायर25 या दोघाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी अरविंद हिरे 45 याला उपचारासाठी उल्हासनगर येथे नेन्यात आले मात्र उपचारादरम्यान हिरे याचा मृत्यू झाला .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email