कल्याण पूर्वेत चिंचपाडा येथील महिलेचा विनयभंग व् अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त.
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : कल्याण पूर्वेत राहणारी २८ वर्षीय महिला आपल्याला मुलाला चिंचपाडा येथील हॉली क्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये सोडायला जात असे .दरम्यान चेंबूर येथे राहणारा सुनील बबन खरात ( ३० ) हा त्या महिलेचा पाठलाग करतो .त्याने त्या महिलेला शाळेच्या गेटवर अडवून तिचा हात पकडून विनयभंग केला .तुझे काढलेले फोटो नवऱ्याला पाठवतो तसेच नवरा आणि मुलाला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली .याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
पूर्ववैमनस्यातून मारहाण
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील कृष्णा हाईट्स मध्ये राहणारा तेजस बाळू रेंगडे (१८) हा रविवारी रात्री त्याचे मित्र सरगम राठोड ,अभिषेक पवार यांचे सोबत तिसगाव पाडा – साईबाबा मंदिर कडून पायी जात असताना भालचंद्र गायकवाडने मागील भांडणाचा राग मनात धरून तू जास्त उडतो का ? असे विचारले .त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या मारुती शिंदे व ललित गव्हाणे या मित्रांनी त्याला शिवीगाळ करीत ठोशाबुक्क्याने मारहाण केली .तसेच त्याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने दुखापत केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
लिफ्ट सामानाची चोरी
डोंबिवली : डोंबिवली येथील पलावा – २ सेक्टर ५ मधील फोन्टनाश इमारतीच्या समोर लिफ्टचे ऑटोमेटीक कंट्रोलर सिस्टीमचा एनकोडर तसेच एलीमेक लॉजिक कंट्रोलर आदी वर्णनाचा सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीचा माल चोरीला गेला .याप्रकरणी आशीद बोरो मुखर्जी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
पैशांची चोरी
डोंबिवली : ठाकुर्ली बारा बंगला येथील जानकी सोसायटीत राहणारे गंगाधर ऐतप्पा पुत्रान ( ६६ ) यांनी डोंबिवली स्टेशन जवळील कॅनरा बँकेतील खात्यातून १० हजार रुपये काढून प्लास्टिकच्या पिशवीत गीन्दाळून रेक्झीन बेगेत ठेवले .त्यानंतर ते औषधे आणि दिवाळी खरेदीसाठी बाजीप्रभू चौकात गेले .खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बेगेतील प्लास्टिक पिशवीत ठेवलेले पैसे चोरी केले .याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .