कल्याण पूर्वेत घरफोडी
कल्याण – कल्याण पूर्वेकडील तिसगाव रोड साईबाबा सोसायटी मध्ये राहणारी ६५ वर्षीय महिला सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून कामानिमित्त कामोठे येथे राहणा-या आपल्या मुलीकडे गेली होती .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील एकूण ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले .काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरु केला आहे .
Please follow and like us: