कल्याण पूर्वेत घरफोडी
कल्याण दि.०१ – कल्याण पूर्वेकडील कोल्शेवाडी न्यू जिम्मी बाग भानुशालीत राहणारे मयूर बिरपण हे काल सायंकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांची पत्नी रात्री झोपण्यासाठी शेजारी गेली यावेली घराला कुलूप असल्याची संधी साधता अज्ञात चोरत्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले .सकाळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .