कल्याण पूर्वेत घरफोडी
कल्याण – कल्याण पूर्वेकडील कैलास नगर येथील पांडे चाळीत राहणारी 75 वर्षीय महिला बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून काही दिवसाकरिता बाहेर गावी गेल्या होत्या .ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील 18 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले .काल सकाळी घरी परतल्या नंतर त्याना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .