कल्याण पूर्वेत घरफोडी
डोंबिवली : कल्याण पूर्व परिसरात घरफोडीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे .काल काटेमानवली परिसरात पुन्हा दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत .कल्याण पूर्व काटेमानवली येथे रमेश पावशे चाळीत राहणारे नरेंद्र ठाकूर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नरेंद्र ठाकूर व त्यांच्या शेजारी राहणारे दोघे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधता अज्ञात चोरत्यांनी काल रात्रीच्या सुमारस दोन्ही घराचे कुलूप तोडून घरतील सोन्याचे दागिने ,मोबाईल ,रोख रक्कम असा मिळून २७ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनस आले त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.