कल्याण पूर्वेत घरफोडी,१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली  – कल्याण पूर्वेत घरफोडीच्या घटना मध्ये वाढ होत असून चोरट्यांनी बंद घरे फोडण्याचा सपाटा लावल्याने नागरिक दहशतीच्या वातावरणात आहे .या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे वाढत्या गुन्ह्यांच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे .कल्याण पूर्व कोलशेवाडी काटेमानवली येथील मथुरा निवास गोवर्धन चाळीत राहणारी महिला काल सायंकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने मिळून एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरत चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.