कल्याण पूर्वेतील बुध्द विहारातील बुध्द मुर्तीची चोरी,बौध्द बांधवांनी दिला आंदोलनाचा इशारा !
( श्रीराम कांदु )
लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ असलेल्या तथागत बुध्दविहारातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची पितळेची मुर्ती काल रात्री चोरीला गेली आहे .
या प्रकारामुळे बौध्द समाजात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या चोरीचा छडा पोलिसांनी त्वरीत लावावा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्जजनिक जयंती उत्सव कमिटी तसेच तमाम बौध्द बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे .
गेल्या पांच वर्षाहून अधिक काळ आस्तित्वात असलेल्या या तथागत बौद्ध विहारात प्रतिदिन बौध्द पुजापाठ तसेच विविध धम्म कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात . बौध्द बांधवांचे आदराचे आणि श्रध्देचे स्थान असलेल्या या बौद्ध विहारातील तथागत गौतम बुद्धांची तीन फुट उंच आणि सुमारे २० कीलो वजनाची पितळेची भरीव मुर्ती चोरीला गेल्याची बाब आज सकाळी काही स्थानिक बौद्ध बांधवांच्या लक्षात येताच या बाबतची खबर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली असून घटना स्थळी पोलीस आयुक्त तसेच कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांनी भेट देऊन तपास कार्यास सुरुवात केली आहे .
दरम्यान या घटनेची कल्याण पूर्व परिसरात बौध्द बांधवांत खबर लागताच समाजातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनी तसेच बौद धम्म व आंबेडकरी विचारांच्या विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी बौद्ध विहारास भेट देऊन या चोरीच्या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त घोलिसांनी या चोरीचा छडा युध्दपातळीवर लावून चोरीला गेलेली मुर्ती ताब्यात घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे .
Please follow and like us: