कल्याण पूर्वेतील पहिल्या बस सेवेचे उदघाटन व सीवरेज ट्रीटमेंट प्लान्टचा आमदारांचा पाहणी दौरा

( जय दुबे )

कल्याण : कल्याण महापालिका परिवहन सुरू होऊन अनेक वर्षे झाली पण कल्याण पूर्व मध्ये ही परिवहन बस सेवा सुरू झालेली नव्हती. आता कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उदघाटण करून ही बस सेवा कल्याण पूर्व रिक्षा स्टॅन्ड ते चिंचपाडा येथे सुरू करण्यात आली आहे.
ही बस सेवा सुरू करण्या साठी परिवहन सदस्य सुभाष मस्के यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी परिवन सभापती संजय पावशे तसेच परिवहनचे अधिकारी उपस्थित होते. कल्याण पूर्वेत ही बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांची समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या बस सेवे मुळे नागरिकांना रिक्षाला देण्या साठी लागणारे भाडे बस मध्ये प्रवास पेक्षा केल्याने कमी लागणार आहे.या परिवहनच्या बस उदघाटना नंतर आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील “सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट” दौरा करीत या प्लान्ट ची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की ” गेल्या दहा महिन्या पासून हा प्लांट बनून तयार झाला आहे.  पिण्या साठी जे पाणी येते त्या पेक्षा शुद्ध पाणी या सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट मधून येते. पण येथे गेल्या दहा महिन्या पासून जे वेस्टज निघते ते फक्त २० ते २५ टन निघाले आहे, ते या पेक्षा जास्त पाहिजे होते. हे निघणारे वेस्टज टाकण्या साठीची व्यवस्था पण येथे नाही. या बाबत येथील अधिकारी देखील समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत ” असेही आमदार गणपत गायकवाड यांनी या वेळी सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email