कल्याण ते कसारा दरम्यान मेगा ब्लॉक :कल्याण ते टिटवाळा विशेष बससेवा
कल्याण -गुरुवारी असणारा कल्याण ते कसारा विशेष मेगा ब्लॉक पहाता कल्याण डोंबिवली महानगरपालिके च्या परिवहन सेवेने कल्याण ते टिटवाळा दरम्यान सकाळी ९.३०ते ४:०० वाजेपर्यंत विशेष बससेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.ज्यातून प्रवाशांना होणारा त्रास बराचसा कमी होणार आहे.
गुरुवारी कल्याण ते कसारा स्टेशन दरम्यान विशेष मेगा ब्लॉकची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. यातून प्रवाशांना होणारा त्रास पाहता महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी सांगितलं कि गुरुवार सकाळी ९:३० ते ४: ०० वाजेपर्यंत कल्याण स्टेशन येथील दीपक हॉटल ते टिटवाळा दरम्यान विशेष १० बसेंस चालवल्या जाणार आहेत. यातून प्रवाशांना होणारा त्रास बराच कमी होईल.त्यांना स्टेशनवर तिष्ठत रहावे लागणार नाही. प्रवाशांची संख्या अधिक वाढल्यास बसेसची संख्या वाढवण्यात येइल असंही ते या वेळी म्हणाले.