कल्याण डोंबिवली महापालिकेत ‘टॅक्स घोटाळा’ -राहुल दामले

कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत टॅक्स घोटाळा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा होत असून गेल्या दोन वर्षात यामुळे केडीएमसीचं १९ कोटी ६० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करबुडव्यांची संख्या फार मोठी आहे. आर्थिक वर्ष संपत येताच प्रभाग अधिकाऱ्यांना थकबाकी वसूल करण्याचं टार्गेट केडीएमसीकडून दिलं जातं. अशावेळी केडीएमसीचे अधिकारी थकबाकीदारांकडून मोठ्या रकमेचे धनादेश घेतात, मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतर हे धनादेश बँकेत टाकले की ते बाऊन्स होतात.

अशाचप्रकारे केडीएमसीत मागील २ वर्षात तब्बल १९ कोटी ६० लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स झाले आहेत. एकीकडे केडीएमसीत असलेल्या आर्थिक चणचणीमुळे विकासकामांना खीळ बसत असताना दरवर्षी असे प्रकार होत असल्यानं यामागे अधिकारी आणि थकबाकीदारांचं संगनमत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केला आहे.

या थकबाकीदारांची यादी हाती लागली असून त्यात प्रभाग समिति निहाय थकबाकीची आकडेवारीही नमूद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन वर्षात या थकबाकीदारांवर केडीएमसीनं कुठलीही फौजदारी कारवाईही केलेली नाही. त्यामुळं या सगळ्यात अधिकारी आणि थकबाकीदार अशा दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली आहे. या नव्या आर्थिक घोटाळ्यामुळे केडीएमसीचे अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email