कल्याण डोंबिवली मध्ये चोरटयांचा धुमाकूळ
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.०६ – कल्याण डोंबिवली मध्ये वाहनांच्या चोरी होण्याच्या घटना दिवसा गणिक वाढत चालल्या असून या वाढत्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी एक रिक्षा सह दोन दुचाकी अद्न्यत चोरट्याने चोरून नेल्याची घटना उजेडात आली आहे. कल्याण पुर्वेकडील राम मारुती रोड चौधरी मोहल्ला येथे मकमुदिन हाऊस मध्ये राहनारे आरिफ रज्जाक यांच्या मालकीची रिक्षा त्यांचा महेश नावाचा मित्र घेऊन गेला. त्याने शनिवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा पश्चिमेकडील अहिल्याबाई चौक येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने संधी साधत ही रिक्षा चोरून नेली. सकाळी ही बाब निदर्शनास येतच रज्जाक यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
कल्याण नजिक आंबिवली येथील राम तरे चाळीत राहणारे नईम बेग यांनी रात्री आपली दुचाकी घर शेजारी पार्क करून घरी निघून गेले. रात्री ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हि दुचाकी चोरून नेली. सकाळी दुचाकी चोरीला गेल्याचे बेग यांच्या लक्ष्यात आले त्यांनी दोन दिवस दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी न सापडल्याने त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
तिसरी घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पुर्वेकडील पलावा सिटी मध्ये राहणार पुरुषोत्तम सावंत यांनी आपली दुचाकी ३१ जुलै रोजी सकाळी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे पार्क केली होती संध्याकाळी कामातून परतल्या नंतर त्यांना दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली नाही त्यांनी शोधा शोध केली मात्र दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.