कल्याण डोंबिवली गुन्हे वृत्त

चोरीचा प्रयत्न फसला

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा गजाआड

डोंबिवली  :: उघड्या दरवाजावाटे घरात घुसून चोरी करण्याच्या चोरट्याचा प्रयत्न फसला हा चोरटा पळून जाण्याच्या बेतात असताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा चोरटा गजाआड झाल्याची घटना कल्याण पूर्व वालधुनी परिसरात घडली आहे .या चोरट्याला नागरिकांनी पोलिसाच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सलमान सय्यद असे चोरट्याचे नाव असून तो वालधुनी परिसरात राहणारा आहे .

     कल्याण पुर्वेकडील वालधुनी अशोक नगर परिसरातील मुर्गीबाई चाळीत राहणारी महिला काल रात्री १ वाजण्याच्या सुमारस आपल्या घरात झोपली होती .यावेळी तिची दोन मुले मित्रांसमवेत बाहेर गेले होते ते परत येणार असल्याने तिने घराचा दरवाजा ढकलून घेतला होता घरात सदर महिला एकटी असल्याची संधी साधत याच परिसरात राहणारा सलमान सय्यद आपल्या एका साथीदार सह या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला मात्र या वेळी आवाज झाल्याने सदर महिलेला जाग आली तिने या दोघांना घरात पाहून आरडा ओरड सुरु केला त्यामुळे सलमान ने आपल्या साठीदारासह या महिलेला धक्काबुक्की करत  पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी सदर महिलेची दोन्ही मुले त्या ठिकाणी आली त्यांनी व आसपासच्या नागरिकांनी आरडा ओरड पाहत या सलमान ला पकडले मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला .या नागरिकांनी या सलमान ला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सलमान सह त्याच्या साथीदार विरोधात गुन्हा दाखल करत सलमानला अटक केली तर त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु केला आहे .

लुबाडण्याचा प्रयत्न

इसमाला बेदम मारहाण

डोंबिवली  : डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरातील आनंद निवास येथे राहणारे रवींद्र कन्नड हे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राजाजी पथ  येथील पाटकर बंगल्या समोरून जात असताना एका बांधकाम सुरु असलेल्या इमारती नजीक पोचताच एका अज्ञात इसमाने त्यांना हटकले.  या इसमाने जबरदस्तीने त्यांची झाडाझडती घेत त्याच्याकडून काहीच न मिळाल्याने संतापलेल्या या इसमाने त्यांना ठोशा बुक्क्यांनी मारहाण करत तेथून पळ काढला.  या मारहाणीत कन्नड यांच्या डोक्याला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी त्यांनी कला डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असुउन या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपाससुरु केला आहे.

—————————————————————————————————

डोंबिवलीत लॉजिंग वर छापा

डोंबिवली  : डोंबिवली काटइ जकात नाका येथील साई श्रद्धा लॉजिंग बोर्डिंग वर ठाणे ए एच टी सी शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत लॉज वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पडदा फाश केला या प्रकरणी पिडीत मुलींची सुटका करत लॉज चालकासह पाच जनाविरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल तीन जणांना अटक केली असून त्यांचे दोन फरार  साथीदारांचा शोध घेत आहेत   डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शील रोड काटइ नाक्यानजीक असलेल्या साई श्रद्धा लॉजिंग बोर्डिंग वर अनैतिक धंदे सुरु असल्याची माहिती ठाणे ए एच टी सी शाखेच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार या शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या लॉजिंग वर छापा टाकत हा अनैतिक धंद्याचा पर्दा फाश करत दोन महिलांची सोडवणूक केली तसेच या प्रकरणी लोज चालक मनेजर सुकेश शेट्टी ,वेटर सुरेश बन्सल ,दलाल बबलू उर्फ राज सोराफाली गाईन ,मंजुनाथ शेट्टी ,सतीश शेट्टी या पाच जना विरोधात गुन्हा दाखल करत सुकेश शेट्टी ,वेटर सुरेश बन्सल ,दलाल बबलू उर्फ राज सोराफाली गाईन या तिघांना अटक केली असून मंजुनाथ शेट्टी ,सतीश शेट्टी हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .

कल्याणात घरफोडी

डोंबिवली  : कल्याण पूर्वेकडील टाटा पावर परिसरात देशमुख होम्स मध्ये राहणारे देवाराम चौधरी हे काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारस आपल्या राहत्या घराला कुलूप घालून बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप तोडून घरात प्रबेष करत घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोकड मिळून तब्बल  ५९ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमार घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलि असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु एकला आहे .

धूम स्टाईल ने एक लाखाची रोकड लंपास

डोंबिवली  : कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरातील धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये राहणारे भर चव्हाण काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील बँकेतून १ लाख रुपये रोकड काढून आपल्या मित्रा समवेत घराच्या दिशेने परतत होते ते कातेमान्वली येथील बोगद्याच्या पुढे एका एतिएम नजीक पोचले असताना एक भरधाव दुचाकी त्याच्या पाठीमागून आली या दुचाकीवर दाणया पेटला व राजू वडारी हे दोन तरून होते .मागे बसलेल्या राजू वडारी या तरुणाने चव्हाण याच्या हातावर जोरदार फटका मारत त्यांच्या हातातील एक लाख रोकड असलेली पिशवी ह्सिकावून धूम ठोकली . या प्रकरणी त्यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दाणया पेटला व राजू वडारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु  केला आहे .

उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून ५६ हजारांचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली  : कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात राहणारे मनमोहन सिंग आपल्या भावासह सोमवारी रात्री घरात झोपले होते मात्र त्याच्या घराचा दरवाजा उघडा होता .मध्यरात्री च्या सुमारास हि संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत दोन मोबाईल व ५ओ हजार रोकड लंपास केली सकाळी उठल्या नंतर त्याना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email