कल्याण डोंबिवलीमध्ये तीन घरफोड्या
डोंबिवली दि.२८ – कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीचे सत्र सुरू असून या वाढत्या घटना मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात दिवसभरात डोंबिवली मध्ये २ व मानपाडा पोलीस स्थानकात १ घरफोडीच्या घटनेची नोंद झाली. डोंबिवली पूर्वेकडील सुरभी हॉटेल शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बंद करून हॉटेल मालक विकास शेट्टी घरी निघून गेले.
हॉटेल बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या टॉयलेट चे ग्रील तोडून दुकानात प्रवेश करत हॉटेल मधील मोबाईल,रोकड,लॅपटॉप असा मिळून एकुन १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
दुसरी घटना डोंबिवली येथील एका क्लास मध्ये घडली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील पाटकर रोड विजप्रभा बिल्डिंग मध्ये सुनील जोशी यांचे एलन क्लासेस आहे. गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास क्लास बंद करून ते घरी निघून गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या क्लासचे कुलूप तोडून क्लास मध्ये घुसून लॅपटॉप चोरुन नेला .या प्रकरणी जोशी यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
तिसरी घटना भोपर गावात घडली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव कमानी जवळ मुक्ताबाई चाळीत राहणारे कृष्णा भावे हे काल सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील तोडून घरात प्रवेश करत घरातील २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले .सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.