कल्याण डोंबिवलीत मार्चमध्ये प्रथमच तापमान ४१.७ वर गेले

शहरात तापमानाचा पारा चढला 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली –   मार्च महिन्याच्या अखेरीस कल्याण व डोंबिवलीत गेल्या अनेक वर्षात प्रथमच पारा 41.7पर्यंत गेल्याने नागरिक त्रस्त झाले असून ऐन दुपारी रस्ते ओस पडल्याचे दिसत आहे मार्च अखेर तापमानाचा पारा पहिल्यादा चाळीशीच्या वर चढल्याचे नागरिक सांगतात .वातावरणातील बदलाने तापमानवाढीचे परिणाम कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळत असून रविवारी इथल्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली. आज दुसऱ्या दिवशीही कल्याण डोंबिवलीतील पाऱ्याने सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास चाळीशी ओलांडली. त्यावरून आजचा दिवसही कल्याण डोंबिवलीकरांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात आधी ढगाळ वातावरण नंतर रात्री पावसाच्या सरी मग मध्येच वातावरणात रात्रीच्या सुमारास आलेला गारठा असे बदल अवघ्या काही दिवसांत पाहायला मिळाले. तर रविवारी म्हणजे 25 मार्च रोजी अचानक कल्याण डोंबिवलीतील तापमानाने उसळी घेतली. कालचा रविवार यंदाच्या मौसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. त्याचीच पुनरावृत्ती आजही होणार असे दिसत आहे. आज सकाळपासून पुन्हा वातावरण चांगलेच तापलेले जाणवत आहे. सकाळी अवघ्या साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इथल्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडलेली पाहायला मिळत आहे. सकाळी 9.37 वाजण्याच्या दरम्यान कल्याणात 35.7 डिग्री सेल्सिअस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाली आहे. अद्याप दुपारचा प्रहर बाकी असून हा पारा 40 .7 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचला.दरम्यान वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे डॉक्टरांनी आवाहन केलं आहे.वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी ऊसाच्या रसाची दुकाने भरली असून थंड पेयांची मागणी वाढली आहे वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी गॉगल, टोपी यांचा वापर करावा असे आवाहन डॉकटर करत आहेत. डोंबिवलीत मात्र तापमानाची नोंद करणारी अजूनही सोय नाही स्मार्ट सिटीचे गाजर देणार्यानी याचा विचार केला पाहिजे अशी चर्चाही होवू लागली आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email