कल्याण–डोंबिवलीत मात्र गेली १० ते १२ दिवसांपासून एक माकड मांजरीच्या पिल्लाला घेवून शहरात फिरताना दिसत आहे

(म विजय )

मांजरासोबत माकडीन डोंबिवलीत त्या माकडाने मांजरीच्या पिल्लासह आपला मोर्चा कल्याण शहरात वळवला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवलीत ठिकठिकाणी या दोघांचा शोध घेत तब्बल १२ दिवस उलटले. मात्र या दोघांचा ठावठिकाणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लागला नसतानाच रविवारी दुपारच्या सुमाराला कल्याणच्या गांधी चौकातील एका हॉटेलच्या गल्ल्यावर त्या माकडाने मांजरीच्या पिल्लासह उडी मारुन खमंग – ढोकळा आणि समोस्यावर ताव मारला. यावेळी हॉटेल मालकाने विरोध न करता, त्यांना पोटभर खाऊ दिले. मात्र बघ्याची गर्दी या हॉटेलसमोर जमल्याने या माकडाने पुन्हा मांजरीच्या पिल्लासह तेथून पळ काढला.
दरम्यान कल्याण डोंबिवली शहरात मदारीने सोडलेल्या माकडापैकी एकच माकड वनाधिकाऱ्याच्या तावडीत सापडले आहे. तोही जखमी अवस्थेत असून त्याच्यावर ठाण्याच्या प्राणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता मात्र या माकडाने शहरात उत्पात वाढवल्याने त्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक करीत आहेत

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email