कल्याण डोंबिवलीत दोन घरफोड्या
डोंबिवली – डोंबिवली पुर्वेकडील राजाजी पथ आम्ररिता इमारती मध्ये राहणारे दीपक जोशी ( ५८ ) बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सूमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरातील ८५ हजार रुपयांची रोकड चोरून नेलि .दुपारच्या सुमारास घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले .त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हील परिसरात माधव संसार इमारती मध्ये राहणारे राजेंद्र शिधये १६ तारखेला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून चार दिसवांपूर्वी मुंबई येथे पाहुण्यांकडे गेले होते .हिं संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे ]कुलुप तोडून घरातील २५ हजार रुपयांची रोकड लॅम्पस केली काल घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याच निदर्शनास आल्याने त्यानि या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.