कल्याण डोंबिवलीत चोरट्यांचा उच्छाद व् अन्य अपराध वृत्त.

 (श्रीराम कांदु)

डोंबिवली  : कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून बंद दुकाने ,घरामध्ये चोरी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास करणारे चोरट्या पासून आता मंदिरे हि सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे .गेल्या दोन दिवसात एकूण दोन दुकान दोन घरांसह एका मंदिरात हि चोरट्यांनी डल्ला मारला असून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे .या वाढत्या घटना मुले नागरिकामध्ये भीतीचे वातावरन पसरले असून पोलीस यंत्रणा हि चक्रावली आहे .या प्रकरणी विविध पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे .

कल्याण पूर्वेकडील सूचक नाका परिसरात तिवारी चाळीत राहणारे गनि शेख यांचे कल्याण शिळ रोड वरील पिसवली येथे ताज मोबाईल शॉप नावाने दुकान आहे .गुरुवार्री रात्री शेख यांनी नेहमीप्रमाणे दुकानाला कुलूप लावून घरी निघून गेले असताना अज्ञात इसमांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील मोबाईल व रोकड मिळून एकूण ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला .काल सकाळी दुकान उघडण्यास गेलेल्या शेख यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी त्यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून  या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाकरत पुढील तपास सुरु केला आहे .दुसरी घटना कल्याण पूर्वेकडील कोल्शेवाडी परिसरात घडली आहे .उल्हासनगर येथे राहणारे जितु उर्फ जेठा जबृमाल अहुजा यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून कोल्शेवाडी परिसरात त्यांचे पूजा फोटो ग्राफी नावाने दुकान आहे .गुरुवारी रात्री अहुजा यांनी आपल्या दुकानाला कुलूप लावून ते घरी निघून गेलेलं असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील तीन कम्रेरे व हार्डडिस्क मिळून एकूण ६९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला  .काल दुकान उघडल्या नंतर त्याना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी त्यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानाकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तिसरी घटना कल्याण पूर्वेकडील कोल्शेवाडी परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात घडली आहे .या परीसारतील मानस बिल्डींग मध्ये राहणारे राजेश हेगडे काल दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते .हि संधी साधत भरदुपारी अज्ञात चोरट्याने घरचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा मिळून एकूण ४३ ह्जारंचा मुद्देमाल लंपास केला आहे .चौथी घटना डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात घडली आहे .या परिसारत रहाणारे संकल्प अपार्टमेंट मध्ये राहणारे संतोष पालव काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .घरल कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व लपटोप सह एकून २ लाख ६२ हजार ३०० रुपयांचा मुद्दे माल लंपास केला याप्रकरणी पालव यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .पाचवी घटनेत्त्र चोरट्यांनी चक्क मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे .कल्याण पूर्वेकडील कचोरे येथील गावदेवी मातेच्या  मंदिरात घडली आहे .काल पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून गावदेवी मातेचा २० हजार रुपये किमतीचा सोन्याचे पाणी केलेला मुखवटा चोरून नेला सकाळी दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भक्तांच्या हि बाब लक्षत आल्याने त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

 
धक्का मारत मोबाईलचे नुकसान झाल्याचे सांगत सोन्याचे दागिने  लंपास

डोंबिवली  : रस्त्याने चालताना धक्का लागल्याचा बहाणा करत जबरदस्तीने वाद घालत हातचलाखीने ५० हजारचे दागिने काढून घेत  लंपास केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस अली आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

    डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड अनुराग बिल्डींग मध्ये राहणारे लालटू मन्ना हे बुधवारी पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्या समोरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना हटकले .तुमचा धक्का लागल्याने आमचा मोबाईल पडला व त्याचे नुकसान झाले असे सांगत जबरदस्तीने मन्ना यांच्याशी या दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली व त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने मन्ना यांच्याजवळील सोन्याची चैन ,अंगठी असा मिळून एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घटे पसार झाले .या प्रकरणी मन्ना यांनी काल डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .

बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून तिघांना गंडा

डोंबिवली : बनावट डेबिट कार्डाचा वापर करत अज्ञात इसमाने तब्बल तिघा जणांच्या बँक खात्यातून ५६ हजार रुपये काढल्याची घटना उघडकीस  आली असून या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरातील चंद्रकांत भुवन ,मध्ये रहाणारे सखाराम सामंत यांच्या बँक खात्यातून अज्ञात इसमाने त्यांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून बनावट डेबिट कार्ड बनवून या कार्डच्या माध्यमातून २९ नोव्हेंबर ते १३ डिसेम्बर दरम्यान तब्बल ४० हजार रुपये काढून घेतले. तसेच सुजित भोकरे यांच्या बँक खात्यातून ६ हजार रुपये ,कुणाल डांगे यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये असे एकूण ५६ हजारांचा गंडा घातला आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला असून या तक्रारी नुसार पोलीसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email